राजू तावडे / सावंतवाडी :- महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नेमणूकीतील पोलीस हेड कॉस्टेबल श्री. सुनिल दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी ३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत केलेल्या कारवाई बद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देवून त्यांचा महामार्ग पोलीस मदत केंद्र, पळस्पे, नवीमुंबई येथे सत्कार करण्यात आला.
त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून त्यांची निवड करण्यात येवून त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील आयोजित रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेकला यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देवून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.
यावेळी महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक तानाजी चिखले , पोलीस उप अधीक्षक . श्रीमती ज्योत्स्ना रासम, म.सु.प., रत्नागिरी विभाग, पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली जाधव यांचे उपस्थितीत तसेच महामार्ग पोलीस केंद्र कसाल, जिल्हा-सिंधुदुर्ग, हातखंबा, चिपळूण, कशेडी, जिल्हा-रत्नागिरी, वाकण, महाड, बोरघाट, जिल्हा-रायगड, पळस्पे, नवीमुंबई या पोलीस मदत केंद्रांकडील प्रभारी पोलीस अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.