रत्नागिरीचे संपर्क मंत्री झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा सत्कार…

57

रत्नागिरी / प्रतिनिधी :- ज्या परिस्थितीत इथला भाजपाचा कार्यकर्ता काम करत आहे त्यांचे कौतुकच आहे. आता त्याला बळ देण्याचे काम मी रत्नागिरीचा संपर्क मंत्री म्हणून करणार, आपण एकत्र काम करूया आणि इथे भाजपला एक नंबरचा पक्ष बनवूया असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा भाजपचे संपर्कमंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीच्या मेळाव्यात व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, ज्येष्ठ नेते बाबा परुळेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नागिरीचे संपर्क मंत्री झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने ना. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ना. राणे यांनी कार्यकर्त्याना संबोधताना रत्नागिरीतील भारतीय जनता पक्ष बळकट करताना माझ्या नजरेसमोर इथे फक्त भाजपा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान हेच माझं ध्येय धोरण असेल. तुमच्यावर जर अन्याय झाला तर दुसऱ्या क्षणाला नितेश राणे इथे पोहोचेल असेही मी प्रशासनाला सांगून ठेवला आहे. त्यामुळे आता ताकदीने कामाला लागा. तुमच्याच विचारांचे खासदार आणि संपर्क मंत्री पक्षाने इथे आपल्याला दिले आहे. आता पक्ष तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे. तुमच्या कामाला हिंदुत्ववादी विचारांची जोड द्या. आता पक्षाने बळ दिल्यावर जोमानं कामाला लागा. सभासद नोंदणीकडे लक्ष द्या. जिल्हा परिषद गटनिहाय दौरा आपण करू. जिथे आपले सरपंच आहे तिथे त्यांना निधी देऊ, येणारा काळ हा शब्द प्रतिशत भाजपचा काळ आहे. आपल्याला स्वतःच्या ताकदिने उभं राहायचं आहे. बदल नक्की घडवू. आता एकत्र काम करूया आणि या जिल्ह्यात भाजपा हाच एक नंबरचा पक्ष असेल इतके सक्षम होऊया असे यावेळी ना. राणे यावेळी म्हणाले.