नाधवडे येथिल गुळ कारखान्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज होणार मोळी पूजन

109

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गूळ निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे तरी सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील तरुण एकत्र येऊन अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली असून या कंपनीने गूळ निर्मिती कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला यावर्षी या उभारण्यात आलेल्या गूळ निर्मिती कारखाना सुरू करण्यात येणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोळी पूजन आणि कंपनीच्या लोगो चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या वेळी पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे , जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे , बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक ,रत्नागिरी नरेंद्र देवरे, एम .एस. एम.ईचे प्रादेशिक व्यवस्थापक,कुडाळ ब्रिजजेश मालिक उपस्थित राहणार आहेत तरी सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने केले आहे.