शेडेकर चिखलफेक प्रकरणात आणखी ११ आरोपी निश्चीत

5

कणकवली / प्रतिनिधी

कणकवली गडनदी पुलावर महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक व पुलाला बांधून ठेवल्याप्रकरणी आता पर्यंत १९ आरोपींना अटक करण्यात आली होती़ त्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अन्य काही आरोपींची धरपकड करण्यात आली आहे़ अजून ११ आरोपी या प्रकरणात कणकवली पोलीसांनी निश्चित केले आहे़ त्या आरोपींमध्ये राकेश प्रल्हाद परब (रा़ चुनवरे, ता़ मालवण), जावेद रशिद शेख (रा़ पटकीदेवी कणकवली), अजय अनंत गांगण (रा़ कणकवली), सुशिल शांताराम पारकर (रा़ कणकवली), उपेंद्र विलास पाटकर (रा़ कणकवली), सिध्देश प्रकाश वालावलकर (रा़ कणकवली), समिर विलास प्रभूगांवकर (रा़ वागदे), औदुंबर चंद्रकांत राणे (रा़ कणकवली), लवू रामचंद्र परब (रा़ हळवल), शामसुंदर नारायण दळवी (रा़ कळसुली), संजीवनी सुरेश पवार (रा़ कणकवली) या ११ आरोपींचा समावेश आहे़ या प्रकरणात आरोपींची संख्या ३० वर पोहोचली आहे़ अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करीत आहेत.