केंद्राकडे निधीची चणचण

10

तळेरे-कोल्हापूर-रस्त्याचा डीपीआर धूळ खात पडून

मुंबई – वाहतुकीची वर्दळ आणि. धोकादायक असॆलला तळेरे-कोल्हापूर हायवे रस्त्याच्या रुंदीकरणाचा डीपीआर गेली दोन वर्षे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात धूळ खात पडला असून या ९० किलो मीटर रस्त्यांपैकी पैकी अवघ्या दोन किलोमीटरचा एक फेज मंजूर झाला आहे.उरलेल्या दोन फेजच्या ८८ किलो मीटर रस्त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने मंजूर झाला नाही अशी माहिती हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तळेरे कोल्हापूर हा सुमारे ९० किलोमीटरचा रस्ता सध्या एनएच क्रमांक ६६ असा जाहीर झाला आहे.या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ,रस्त्यावरील खड्डे.अरुंद रस्ता आणि करूळ घाटाची झालेली दुर्दशा लक्षात घेता राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ४३० कोटी रुपयांच्या डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल ) बनवून तो ना.नितीन गडकरी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
त्यात या रस्त्याचे १० मीटर रुंदीचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि दोन्ही बाजूला दोन तीन मीटर रुंदीचा कच्चा रस्ता असा एकूण १४ तर वळण असेल तर १८ मीटरचा अंतर्भूत असलेल्या रस्त्याचा या डीपीआर मध्ये समावेश आहे.
या डीपीआर मध्ये १) तळेरे-गगनबावडा,२)गगनबावडा -कोल्हापूर,आणि ३)कोकिसरे रेल्वे फाटक अशा तीन फेजचा समावेश आहे.परंतू यातील तीन नंबरचा कोकिसरे ते रेल्वे फाटक येथील दोन किलोमीटरचा एक फेज रस्ता माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे.त्यासाठी ६४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.रेल्वे ब्रिज खालून बोगदा होणार असून बाकी दोन्ही बाजूला सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्यावर निधी खर्च होणार आहे.
बाकी दोन फेजचा सुमारे ८८ किलोमीटरच्या रस्त्याचा डीपीआर अद्याप ना.गडकरी यांच्या दालनात धूळ खात पडला आहे.केंद्र शासनाकडे पैशाची चणचण असल्याने या रस्त्याचे काम रखडले असे संबंधित अधिकाऱ्यांनी बोलतांना सांगितले.जो पर्यंत डीपीआर मंजूर होत नाही तो पर्यंत त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याला करावे लागणार आहे .या खात्याच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तळेरे-कोल्हापूर रस्त्याचा प्रवास नको तो म्हणण्याची वेळ येत आहे.