तौक्तेसाठी 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपये जिल्ह्याला मिळणार…

9

 

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-

72 कोटी रुपये एसडीआरएफ आणि  एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मिळणार होते. परंतू हे निकष बदलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महोदयांनी कोकणचा दौरा केला त्यामुळे 252 कोटीची भरीव तरतूद कोकणाला मिळाली आहे. 17 कोटी 35 लाख 96 हजार 300 मिळणार होते. त्याऐवजी 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपये तौक्ते वादळाच्या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला मिळणार आहेत. चक्रीवादळामुळे पूर्णतः बाधीत घरे 88, 15 टक्क्यांमध्ये 6 हजार 196  बाधीत घरे. 25 टक्क्यांमध्ये 2 हजार 361 घरे बाधीत झाली आहेत. तर 50 टक्क्यांमध्ये 438 घरे बाधीत झाली आहेत.

 

प्रत्येक तालुक्याला 5 कटर

 

पालकमंत्री श्री. सामंत यांनी मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आपतकालीन यंत्रणा सज्ज झाली आहेच. प्रत्येक तालुक्याला 5 कटर, वन खात्याला दोन असे एकूण 50 कटर नव्याने खरेदी करावेत. अशी सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी केली.