जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 11 ऑगस्ट रोजी…

16

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:-

 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली-सावरवाडी तालुका सावंतवाडी या प्रशालेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी साठी प्रवेश निवड चाचणी परीक्षा बुधवार दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येत असल्याची अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्रीजीतबाबू नयना यांनी दिली.

              या प्रवेश परीक्षेच्या निवड चाचणीसाठी आवेदन केलेल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/index.aspx या संकेतस्थळावर आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावीत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र घेऊन परीक्षा केंद्रावर वेळेत हजर रहावे. सोबत मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बाटली व परीक्षा लेखनासाठी आवश्यक असलेले साधन घेऊन यावे. अधिक माहितीसाठी शाळेचे प्राचार्य श्रीजीतबाबू नयना (मो.9428129201, उप प्राचार्य मीरा सिह (9422766852), परिक्षा प्रमुख जे. बी. पाटील (9420294584) व एस.पी. हीरेमठ (9421340312) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशालेच्यावतीने करण्यात आले आहे.