कणकवली-फोंडा मार्गावर माल वाहतूक करणारा ट्रक रुतला चिखलात…

21

कणकवली/प्रतिनिधी:-

कणकवली-फोंडा मार्गावरील पाचोबा मंदिरानजीक माल वाहतूक करणारा ट्रक चिखलात रुतला. या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका वाहनचालकांना बसला. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून चिखलात रुतलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.