अधिकाऱ्यांवर दबाव आणून कणकवली शहरातील नागरिकांसाठीचे लसीकरण सत्र रद्द करण्यास भाग पाडले; कणकवली नगराध्यक्षांची माहिती…

21

कणकवली/प्रतिनिधी:-

शहरात उद्या ८ सप्टेंबर रोजी नगरवाचनालय हॉल मध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु कणकवली शहरातील जनतेच्या हिताच्या नेहमीच आड येणाऱ्यानी आपली प्रवृत्ती पुन्हा एकदा दाखवली आहे. सत्तेचा गैरवापर करून जि. प. सीईओ, डिएचओ, व प्रशासनावर राजकीय दबाव आणत कणकवली शहरासाठीचे आयोजित केलेले लसीकरण सत्र रद्द करण्यास या प्रवृत्तींनी भाग पाडले आहे. त्यामुळे कणकवली नगरवाचनालयाच्या हॉल मध्ये उद्या होणारे लसीकरण सत्र होणार नाही. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तसेच जनतेची या बद्दल दिलगिरीही व्यक्त केली.

कणकवली शहरातील जनतेसाठी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांच्या माध्यमातून स्वतंत्र डोस उपलब्ध केले होते. पण या बाबतची माहिती मी दिल्यानंतर श्रेया साठी धडपड करण्याच्या नादात काहींनी आपणच हे डोस कशे आणले हे अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात जर, हे डोस शहरवासीयांना मिळाले तर नगरपंचायतला व आम्हाला श्रेय मिळेल म्हणून सत्तेचा दुरुपयोग करत अधिकाऱ्यांवर दबाव आणला. व हे लसीकरण सत्र रद्द करण्यास भाग पाडले. पण कणकवली शहरातील जनतेसाठी येत्या काळात आम्ही जास्तीस जास्त लसीकरणासाठी प्रयत्न करून शहरातील जनतेचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करून घेऊ . सत्तेचा फायदा जनतेला करायचा असतो, दुरुपयोग जनता ओळखते.त्यामुळे कणकवली शहरातील जनतेच्या लसीकरणासाठी जरी विरोध झाला तरी जनतेचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतच राहणार असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.