महाराष्ट्र एटीएसची टीम दिल्लीत दाखल; संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेखची करणार चौकशी…

27

मुंबई/प्रतिनिधी:-

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख याची चौकशी करण्यासाठी एटीएस पथक दिल्लीत पोहोचले आहे. जान मोहमद याच्यावर आयएसआय एजंटच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. जान मोहम्मद हा मुंबईतील धारावी येथे राहणारा असून त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या कोटा येथून अटक केली होती. जान हा दाऊद गँगसाठी काम करत असल्याची माहिती असल्यामुळे दिल्ली पोलिसांच्या परवानगीनंतर महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी त्याची चौकशी करणार आहेत.