कणकवलीत प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते गणेशमूर्ती वर पुष्पवृष्टी; तहसीलदार आर जे पवार यांची प्रमुख उपस्थिती…

44

कणकवली/प्रतिनिधी:-

अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने कणकवली नगरपंचायत मार्फत गणपती साना मार्गावर गणेश मूर्तींवर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते व तहसीलदार आर जे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, बंडू गांगण यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीमती राजमाने व श्री पवार यांनी नगरपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.