पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी…

10

मुंबई/प्रतिनिधी:-

महाराष्ट्राच्या विविध भागांत गुलाब चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील विविध भागांत लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकरकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. पंरतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.