करुळ घाटात ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा…

16

वैभववाडी/प्रतिनिधी:-

करूळ गगनबावडा घाटामध्ये रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्यामुळे अवजड वाहतूक करणारे दोन ट्रक या घाटामध्ये रात्री 8 च्या सुमारास बंद पडल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घाटामध्ये गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

घटनास्थळी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम पोचली असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  पण रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कोल्हापूर पुणे मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात वैभववाडीतून फोंडघाटमार्गे जाण्यास सांगितले जात आहे.