ट्रेन ला बैल धडकल्याने कोकिसरे रेल्वे क्रॉसिंग परिसरात दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा…

18

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी येथील कोकिसरे रेल्वे फाटक परिसरात सायंकाळी ०६.४५ दरम्यान छोटा अपघात झाल्याने ट्रक वाहतूक करणारी रेल्वे रेल्वे फाटकावर उभी करण्यात आली आहे. रेल्वे क्रॉसिंग परिसरात दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

मुंबई वरुन गोव्याकडे ट्रक वाहतूक करणारी ६५९८ डाउन ट्रेन वैभववाडी रेल्वे फाटक परिसरात आली असताना ट्रेन ची रुळावर आलेल्या बैलाला धडक बसल्याने अपघात झाला आहे. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला असून बैलाला रुळावरून बाजूला करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले त्यामुळे तासाहून अधिक काळ रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेर एक तासाने रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली.