वैभववाडीत भाजपचे आज धरणे आंदोलन

17

 

वैभववाडी / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनेच्या विरोधात भाजपच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन करून निवेदन देण्‍यात येणार आहे . वैभववाडीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करून तहसिलदार यांना निवेद देण्‍यात येणार आहे .आणि हिंसक घटना घडवणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.तरी तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता भाजपा कार्यालयात मोठ्या संख्येने उपास्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.