कुटुंबातील सदस्य या नात्याने आम्ही जेवढे करता येईल तेवढे शंभर टक्के करत राहणार – निलेश राणे

14

वैभववाडी/ प्रतिनिधी
वैभववाडीमध्ये कुटुंबातील सदस्य म्हणून आलो आहे. आ. नितेश राणे या भागाचे आमदार आहेत. तालुका विकासासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करत आलो आहोत. यापुढे देखील कुटुंबातील सदस्य या नात्याने आम्ही जेवढे करता येईल तेवढे शंभर टक्के करत रहाणार आहोत. कुटुंबातील जेष्ठ मंडळीचा आशिर्वाद आमच्या मागे राहुदे. असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी व्यक्त केले.
माजी खासदार निलेश राणे यांनी भुईबावडा शिमगोत्सवाला भेट देवून पालखीचे दर्शन घेतले. यावेळी वैभववाडी स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे, महीलाध्यक्ष प्राची तावडे, शुभांगी पवार, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, युवक अध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, रविंद्र रावराणे, आकोबा मोरे, तानाजी मोरे, मनोहर मोरे, बाजीराव मोरे, प्रकाश मोरे, परशुराम मोरे, सुरेश मोरे, आनंद मोरे, सरपंच श्रेया मोरे, स.बा. देसाई, दत्ताराम देसाई, उदय पांचाळ, रोहीत रावराणे, वैभव रावराणे, प्रकाश पाटील, आप्पा मुद्रस व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश राणे म्हणाले, मी देव दर्शनासाठी आलो आहे. याठिकाणी मी काही राजकीय भाषण करणार नाही. पण वैभववाडीने दिलेल प्रेम, आशिर्वाद आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही असे सांगितले. भालचंद्र साठे यांनी निलेश राणे यांचे स्वागत केले. भुईबावडा ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.