कोकण विकास आघाडीचे मुंबईत २५ डिसेंबरला अधिवेशन…

19

कणकवली/प्रतिनिधी:-

कोकणातील सहाही जिल्हात कार्यरत असलेल्या कोकण विकास आघाडीचे यंदाचे ४३ सावे वार्षिक अधिवेशन शनिवार २५ डिसेंबरला दुपारी ३ वाजता मुंबई-दादर येथील छबिलदास मुलांची शाळा येथील सभाग्रुहात होत आहे. कोविआचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन शिबीर म्हणून होणार आहे, अशी माहिती मुख्य संघटक गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून दिली आहे.

या चिंतन शिबीरामध्ये संघटनात्मक पुढील वाटचाल, शेतकऱ्याच्या प्रश्नांवर चर्चा, कोकणातील पाणी प्रश्नावर विचार विनिमय, पुरापासून संरक्षण करण्यासाठी नदींचा गाळ उपसा, ग्रामीण भागातील शेतकरी बचतगट, शेती उत्पादक कंपन्या याना चालना, ग्रामीण भागातील एस. टी. वाहतूकीच्या समस्या आणि उपाय, रखडलेले पाटबंधारे आणि पर्यटनद्धष्टया प्रकल्प, कोकणातील उत्पादनांना हमी भाव, कोकणच्या माथी उभारण्यात येणारे प्रदुषणकारी प्रकल्प, बोट आणि अंतर्गत जलवाहतूक, मुंबई कोकण गोवा आणि पच्शिम किनारी सागरी महामार्गांची रखडत चाललेली कामे, पटसंख्येअभावी बंद करण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळांच्या समस्या आदी विषयांवर विचार मंथन करण्यात येणार आहे.

तरी कोविआच्या पदाधिकाऱ्यानी, कार्यकर्त्यांनी, हिंतचिंतकांनी कोरोनाचे निकष पाळून अधिवेशनात उपस्थित रहावे, असे आवाहन सरचिटणीस सुर्यकांत पावसकर यांनी केले आहे.