वैभववाडीतील आचिर्णे, खंबाळे,अरूळे इत्यादी गावातील जंगलमय भागात फिरणारा ग्रुप सापडला…

17

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडीतील आचिर्णे, खंबाळे,अरूळे इत्यादी गावातील जंगलमय भागात फिरणारे चोरटे असल्याच्या संशयावरून गेले दोन दिवस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शनिवारी रात्री आचिर्णे ग्रामस्थांनी सदर तरुणांना पकडून वैभववाडी पोलिसांच्या स्वाधीन केले असता ते फिरणारे अनोळखी तरुण चोरटे नसून कातकरी समाजातील तरुण शिकारीसाठी जंगलात फिरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे, खंबाळे, अरूळे गावातील जंगलमय भागात अनोळखी तरुण ग्रूप ने जंगलात ग्रुपने फिरत असल्याचे येथील लोकांच्या निदर्शनास आले होते .

ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत खबर देऊन चौकशी करण्यास खबर दिली होती पोलिसांनी लागलीच सगळ्या गावातील पोलिस पाटलांची मीटिंग करून सतर्क राहण्याचे आदेश दिले होते तसेच अनोळखी व्यक्ती गावातल्या पोलीस पाटील यांनी त्यांचा पूर्ण अड्रेस व्यवसाय चा पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड इत्यादी प्राथमिक चौकशी करून पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी झालेल्या चोरीच्या तपासासाठी सतर्कता बाळगली असून वेगवेगळ्या पद्धतीने तपासाचे सुरू केले आहेत चोरीची घटना ताजी असतानाच कांबळे परिसरातील जंगलात अनोळखी तरुण जंगलमय भागात करत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे पोलिसांना चोरीचा छडा लावणे आणि या निवडणुकीत तरुणांना शोधुन नेमकी वस्तुस्थिती काय आहे शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले होते शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास येथील सचिन रावराणे यांच्या घरी सतत अनोळखी तरुण हे ताण लागल्याने पाणी पिण्यासाठी आले असता त्यांनी पाणी वगैरे देऊन सदर तरुणांना थांबवून घेतले आणि गावातीलच इतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांची संपर्क साधून सदर अनोळखी व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन केले आणि अधिक तपास करण्याच्या सांगितले पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता शिकारीच्या उद्देशाने किंवा काजू काढणे या हेतूने कातकरी समाजातील ही तरुण जंगलमय भागात फिरत असल्याचे निष्पन्न झाले याबाबत कातकरी समाजाचे जिल्हाध्यक्ष नामदेव मोडक यांच्याशी ही पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी संपर्क साधला आणि याबाबत तपास करून सदर तरुणांना सोडून दिले पोलिसांच्या म्हणण्यानुसार तेही रात्री तीनच्या नंतर बाजारपेठ शहरात फिरताना येतात तर एक कातकरी समाजातील तरुणी शिकारीच्या किंवा काजू काढण्याच्या उद्देशाने रात्री आजच्या नंतर जंगलमय भागात करतात त्यामुळे पोलिसांना सुरुवातीलाच याबाबत शंका होती परंतु त्यांची अधिक तपासणी केल्यानंतर येईल हे सिद्ध झाले आहे सदरचे तरुणीही चोरटे नसून कातकरी समाजातील शिकारीसाठी करणारे तरुण असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे गेले दोन-तीन दिवस जंगलमय भागात अनोळखी चोरटे ग्रुपने फिरत असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.