खांबाळे सोसायटीच्या चेअरमन पदी शिवसेनेचे प्रविण गायकवाड तर व्हा. चेअरमन पदी जगदीश पवार यांची बिनविरोध निवड…

47

वैभववाडी/प्रतिनिधी:-

श्री आदिष्टी देवी विकास सेवा सोसायटी खांबाळे ची निवडणूक ग्रामस्थांच्या एकोप्याने राजकिय विरहित आदिष्टी देवी सहकार पॅनेल च्या माध्यमातून ही बिनविरोध केली होती.

या सोसायटीच्या चेअरमन पदी प्रविण गायकवाड आणि व्हाईसचेअरमन पदी जगदीश पवार यांची सर्व संचालकांच्या मधून बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईसचेअरमन व सर्व संचालकांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी माजी चेअरमन दीपक चव्हाण, सुनिल पवार, नवनिर्वाचित चेअरमन प्रवीण गायकवाड, व्हाईसचेअरमन जगदीश पवार, उपसरपंच गणेश पवार, राजाराम वळंजू, रुपेश कांबळे, महेश चव्हाण, प्रसाद कदम, प्रकाश लांजवळ, पुजा लवू पवार, स्नेहलता प्रभाकर पवार, गंगाराम अडुळकर या सर्व संचालकांसह सोसायटी सचिव सिद्धेश रावराणे, माजी सभापती शुभांगी पवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य लवू पवार, जेष्ठ ग्रामस्थ सदानंद वासुदेव पवार,माजी ग्रामपंचायत सदस्य लवू पवार आदी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन श्रीम. सुनिता आशिष भोगले यांनी काम पाहिले. तसेच निवडणूक अधिकारी भोगले मॅडम यांनी सोसायटी बिनविरोध केल्या बद्दल खांबाळे गावातील सेवा सर्व ग्रामस्थांचे , नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.