करुळ भट्टीवाडी येथे 3 मे रोजी वाघजाई देवी वर्धापन सोहळा…

12

वैभववाडी/प्रतिनिधी:-

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दि. 3 मे रोजी श्री वाघजाई देवी वर्धापन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे – सकाळी 5 वा. वाघजाई देवीचा अभिषेक, सकाळी 6 वा. होम-हवन, सकाळी 9 वा. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी महाप्रसाद, दुपारी 2 नंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 4 वा. महिलांसाठी मनोरंजन खेळ, सायंकाळी 7:30 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तू वाटप कार्यक्रम, सायंकाळी 8 वाजता ग्रामस्थांचे सुस्वर भजन, रात्री 9 वाजता शिवचरित्रकार ह. भ. प. दौलत महाराज बोडखे (आळंदी देवाची) यांचे कीर्तन होणार आहे. भट्टीवाडी सेवा मंडळ मुंबई व भट्टीवाडी ग्रामस्थ मंडळ करूळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.