वैभववाडी तहसील कार्यालयात बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी…

10

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी येथील तहसील कार्यालयात बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली. अक्षय तृतीया च्या मुहूर्तावर लिंगायत समाजाचे आराध्य दैवत बसवेश्वर महाराज यांची जयंती जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली. वैभववाडी येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष शंकर स्वामी, पुरवठा अधिकारी रामेश्वर दांडगे, सुशांत फाळके, किसन मगदूम व कोकाटे आदी उपस्थित होते.