कोकिसरे गावचे माजी पोलीस पाटील आबा गुरव यांचे निधन…

14

वैभववाडी/प्रतिनिधी:-

कोकिसरे गावचे माजी पोलीस पाटील जगन्नाथ बाबी गुरव उर्फ आबा गुरव यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रहात्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगा असा परिवार आहे. ते गावातील देवस्थानचे प्रमुख मानकरी होते. ते मनमिळावू व शांत स्वभावाचे होते. पोलीस पाटील पदावर त्यांनी चांगले काम केले होते. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.