तिथवलीत एकाचा नदीत बुडून मृत्यू…

12

वैभववाडी/प्रतिनिधी:-

तिथवली तांबेवाडी येथील संतोष तानाजी तांबे (वय-५५)यांचा आज (ता. २५)सायंकाळी नदीपात्रात बुडुन मृत्यु झाला.ते शुकनदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते. तिथवली बौध्दवाडी येथील संतोष तांबे हे सायंकाळी तीन चार वाजण्याच्या सुमारास तिथवली येथील शुकनदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते.त्यांच्या सोबत वाडीतील आणखी काही जण आंघोळ करीत होते. याचदरम्यान नदी पात्रातील डोहात आंघोळ करताना श्री. तांबे बुडाले.बाजुच्या तरूणांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाला.सायकांळी उशिरा ही माहीती वैभववाडी पोलीस स्थानकात देण्यात आली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला होता.