कै.मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात काव्य वाचनाचे आयोजन…

14

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडीचे सुपुत्र, पत्रकार,गझलकार,कवीवर्य ,स्व. कै.मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आनंदीबाई कला,वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालयेथे सोमवार दिनांक ११जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता काव्य वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कै.मधुसूदन नानिवडेकर प्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन महाराणा प्रताप शिक्षण संस्था स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.