माजी आमदार शंकर कांबळी यांनी गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट…

19

सावंतवाडी/प्रतिनिधी:-

शिवसेनेचे माजी आमदार शंकर कांबळी यांनी शनिवारी गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट घेतली या भेटीदरम्यान पूर्वाश्रमीचे आक्रमक शिवसैनिक तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, सावंतवाडी शहराचे माजी शिवसेना शहर प्रमुख जावेद शेख यांच्याशी प्रदीर्घ चर्चा सुरू होती यावेळी बबन साळगावकर यांनी शंकर कांबळी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही, परंतु या भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाणार असून चर्चेला उधाण आले आहे ,स्वागत करताना यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव शिवाजी चौक मित्र मंडळाचे सचिव दीपक सावंत तसेच राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर हेही उपस्थित होते.