आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद…

17

कणकवली/प्रतिनिधी:-

कणकवलीत भाजपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार नितेश राणे स्वतः या रॅलीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या रॅलीत सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन या रॅलीला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार नितेश राणे यांनी अभिवादन करत या रॅलीला सुरुवात करण्यात आली. तसेच आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना रॅलीच्या प्रारंभीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक, बाजारपेठ, पटकी देवी मार्गे, शिवाजीनगर येथून नडवे रोडवरील तहसीलदार कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे 500 हुन अधिक दुचाकीस्वार व 150 हुन अधिक रिक्षा सहभागी झाल्या. या रॅलीमुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक चांगली वातावरण निर्मिती देखील झाली. या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे, माजि जि प अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, भाजपा प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवन , नगरसेवक अभिजीत मुसळे, मेघा गांगण, ऍड. विराज भोसले, शिशिर परुळेकर, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, पंकज पेडणेकर, नितीन पाडावे, समर्थ राणे, सुरेश सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, स्वप्निल चिंदरकर, सिद्धेश वालावलकर , महेश सावंत, राकेश परब, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभूगावकर, पप्पू पुजारे, बंडू गांगण, नगरसेवक रवींद्र गायकवाड, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, कळसुली सरपंच सचिन पारधीये, राजा पाटकर, भाई आंबेलकर , शिवसुंदर देसाई, कलमठ माजी सरपंच देविका गुरव, लक्ष्मण घाडीगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, इब्राहिम शेख, अभय घाडीगावकर, आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांच्यासह पोलीस बंदोबस्त कार्यरत ठेवण्यात आला होता.