जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातून ८ शिक्षकांचा समावेश…

22

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:-

२०२२ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आठ शिक्षकांना “उत्कृष्ट शिक्षक” पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून एकूण १६ शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील जिल्हास्तरीय निवड समितीने आठ प्रस्तावांची निवड केली आहे. त्याला कोकण आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली आहे.

जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांत कणकवली तालुक्यातून जिल्हा परिषद लोरे नंबर १ शाळेचे उपशिक्षक सत्यवान शांताराम चव्हाण, मालवण तालुक्यातून दाजीसाहेब प्रभूगांवकर जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ चे उपशिक्षक गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, सावंतवाडी तालुक्यातून सावंतवाडी नंबर ४ शाळेचे पदवीधर शिक्षक केशव बाबी जाधव, देवगड तालुक्यातून जिल्हा परिषद हिंदळे भंडारवाडा शाळेच्या पदवीधर शिक्षिका अदिती अविनाश राणे, वैभववाडी तालुक्यातून जिल्हा परिषद नाधवडे ब्राम्हणदेव नवलादेवीवाडी शाळेचे पदवीधर शिक्षिका राजश्री नामदेव शेट्ये, वेंगुर्ला तालुक्यातून कोचरे नंबर २ शाळेचे उपशिक्षक विनोद राजाराम मेतर, कुडाळ तालुक्यातून निवजे नंबर १ शाळेचे पदवीधर शिक्षक विजय बबन धामापूरकर, दोडामार्ग तालुक्यातील घोटगे वायंगणतड शाळेचे उपशिक्षक डॉ उत्तम तुकाराम तानवडे यांचा समावेश आहे.

५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी ५ सप्टेंबर पूर्वी जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार यावर्षी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, त्याचे वितरण कधी करणार हे जाहीर करण्यात आलेले नाही.