पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा…

88

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:-

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. २9 व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दिनांक 29 मे 2023 रोजी सकाळी 6.50 वा. गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. केसरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. केसरी येथून ओरोस कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. ओरोस येथे आगमन व सिंधुदुर्ग भरडधान्य अभियान कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- नवीन जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.30 ते 1.00 वा. हळद लागवडी संदर्भातील नियोजबाबत बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. मोदी @9 अभियानांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणकवली). सायं. 5.00 वा. पत्रकार परिषद (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणवकली). सायं. 6 .00 वा. ते 8.00 वा. राखीव. रात्री 8.00 वा. कणकवली येथून केसरीकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. केसरी येथे आगमन व राखीव.

मंगळवार, दि. 30 मे 2023 रोजी सकाळी 7.00 वा. केसरी येथून झारापकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. झाराप येथे आगमन व झाराप येथून मुंबई-गोवा महामार्ग पाहणीस सुरुवात. सकाळी 8.00 वा. ते 9.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 10 झाराप ते कलमठ या 44 किमी ची पाहणी. सकाळी 9.00 ते 9.15 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 9 कलमठ ते कणकवली या 8 किमी ची पाहणी. सकाळी 9.15 वा. ते 10.00 वा. हॉटेल आशिष येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वा. ते 10.30 वा. मुंबई-गोवा पॅकेज 9 कणकवली ते तळगाव या 31 किमी ची पाहणी. सकाळी 10.30 वा. ते 11.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 किमीची पाहणी. सकाळी 11.00 वा. ते 12.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 7 वाकेड ते कांटे या 51 किमी ची पाहणी. दुपारी 12.00 वा. ते 1.00 वा. मुबई-गोवा महामार्ग पॅकेज 6 कांटे ते आरवली या 40 किमी ची पाहणी. दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी. दुपारी 2.00 वा. ते 3.30 वा. चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.