गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; सेंट्रल रेल्वेकडून 156 स्पेशल गाड्या…

46

मुंबई/प्रतिनिधी:-

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सेंट्रल रेल्वेनं दिलासा देणारी बातमी दिलीय. गणेशोत्सवानिमित्त खास 156 गाड्या सोडल्या जाणार आहेत. रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगावला मुंबई, पनवेल, पुण्याहून स्पेशल ट्रेन्स असणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ट्रेन्स असतील. यासाठी बूकिंग २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेकडून देण्यात आली आहे.

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा एपवरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं बूकिंग करता येणार आहे. यासाठी स्पेशल चार्ज असेल. स्पेशल गाड्यांचे थांबे, वेळ यासाठी NTES एप किंवा www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावरून माहिती मिळेल.

सेंट्रल रेल्वेकडून १५६ गणपती स्पेशल ट्रेन कोकणात धावणार आहेत. यात सर्वाधिक मुंबई-सावंतवाडी रोड डेली स्पेशल एकूण ४० गाड्या या काळात असतील. सीएसएमटीवरून ००.२० वाजता सुटणारी ट्रेन दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीत पोहोचेल. या गाडीच्या १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात २० फेऱ्या होतील. तर सावंतवाडीहून दुपारी ३ वाजून दहा मिनिटांनी सुटणारी ट्रेन सीएसएमटी स्थानकात दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, मानगाव, वीर, खेड, चिपळून, सावरडा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळला थांबतील.