गुरू पौर्णिमे निमित्त वृक्षारोपण, औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे, यांचा उपक्रम 

42

 

वैभववाडी / प्रतिनिधी

नाधवडे येथिल प.पु.श्री.प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी प्रमाने याही वर्षी गुरुपौर्णिमेच औचित्त साधून गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी औदुंवर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर,ट्रस्ट चे आधारस्तंभ हनुमंत नारकर,खजिनदार रुपेश कुडतरकर,सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे अधिकारी प्रल्हाद कुडतरकर,जिल्हा शांतता कमिती अध्यक्ष परशुराम इस्वलकर ,शंकर प्रा.सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रविंद्र गुंडये, ग्रामविकास मंडळांचे खजिनदार रविंद्र खांडेकर,विशाल पावस्कर, प्रफुल घाडी,योगेश शेट्ये,प्रविन गुरव,संतोष सावंत,योगेश घाडी,कृष्णा नारकर,संजय कुडतरकर,अंकित शेट्ये ,पराग चव्हान.निरज तानवडे,दया तानवडे,विकास इस्वलकर,आधी औदुंबर ट्रस्ट चे सदश्य उपस्तित होते.
दरवर्षी ट्रस्ट च्या वतीने गावातील सर्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते.,यात प्रामुख्यांने मंदिर परीसरात सफेद चाफा,सोनचाफा,बेल,यांसारखी तर गावातील स्मशानभुमित सदैव सावली देणारी वड,पिंपळ,जांभळ ,गुलमोहर,तर शाळा परीसरात सुपारी,विविध प्रकारची फुलझाड लावली जातात व त्यांचे संगोपन ही केले जाते.ट्रस्ट च्या वतीने गेली अनेक वर्ष हा उयक्रम राबविला जातो.