किसान समृद्धी केंद्रांचे उद्या दि. २७ जुलैला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; पं. स. वैभववाडी येथे केले जाणार थेट प्रक्षेपण…

13

वैभववाडी/प्रतिनिधी:-

उद्या दि. 27 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वाजता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात एक लाख पंचवीस हजार “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र” सुरू होत आहेत. राजस्थानमधून पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ करत आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पंचायत समिती सभागृह वैभववाडी येथे वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.

किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत, खत आणि औषधांसाठी देण्यात आलेले अभूतपूर्व अनुदान, पंतप्रधान प्रणाम योजनेतून शेती आणि माती रक्षणासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय यानंतर “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रां”चा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणत असल्याची चर्चा होत आहे.