वर्ल्ड स्केटिंग असोसिएशन चॅम्पियनशिपसाठी सांगुळवाडीतील रुद्र रावराणेची निवड

51

वैभववाडी/प्रतिनिधी

नेपाळ येथे होणाऱ्या वर्ल्ड स्केटिंग असोसिएशन चॅम्पियन शिपसाठी सांगुळवाडी येथील रुद्र प्रकाश रावराणे y10 याची निवड झाली आहे त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे रुद्र प्रकाश रावराणे हा स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल आडगाव सहावीत शिकत असून मुंबई येथे नुकत्याच झालेल्या क्लब स्केटिंग असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रुद्र याने गोल्ड मेडल मिळवले होते त्याचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ स्केटिंग नेपाळ स्केटिंग असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे पाच ते सात मे यादरम्यान ही स्पर्धा नेपाळ येथे होणार आहे रुद्र यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे