नाटळ पूरमार मंदिराच्या पटांगणात वृक्षारोपण…

344

राजू तावडे / सावंतवाडी :- गणेश चतुर्थी निमित्त यावर्षी नाटळ खांदार वाडी येथील जागृत देवस्थान श्री देव पुरमार मंदिराच्या पटांगणावर १११ वृक्षांची लागवड करण्यात आली. हा वृक्षारोपण कार्यक्रम रविवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी नाटळ गावचे विद्यार्थी, ग्रामस्थ आणि भाविक यांच्या उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जे. व्हि. परब मास्तर यांनी केले होते. या वेळी विद्यार्थ्यांना सुवर्ण क्षण डॉट कॉम (घरबसल्या लग्न जुळवून घ्या) या संस्थेच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून वधु वर इच्छुकांनसाठी मोफत फाॅर्म नोंदनी वेबसाईटवर करून, आपले लग्न विनामूल्य जुळवून घ्या, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले. यावेळी श्री. प्रभाकर दाजी परब‌‌, प्रशांत तुकाराम परब, कुमार मंदार परब, सुभाष गोविंद चव्हाण उपस्थित होते.