शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाच्या वतीने वैभववाडीत उद्या होऊ द्या चर्चा, विचारा प्रश्न अभियान…

142

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी येथे शिवसेना (उ.बा.ठा)पक्षाच्या वतीने उद्या शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर, २०२३ सकाळी ११.०० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न” अभियानाची कॉर्नर सभा संभाजी चौक वैभववाडी येथे संपन्न होणार आहे.

सदर सभेला शिवसेना सचिव खा. विनायकजी राऊत अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, महिला आघाडीच्या उपनेत्या श्रीमती मीनाताई कांबळी, जिल्हा समन्वयक प्रदीपजी बोरकर, आमदार वैभवजी नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली – देवगड विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हा अधिकारी सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटिका श्रीमती नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख- नंदू शिंदे, जिल्हा कार्यकारणी- सदस्य संदीप सरवणकर हे उपस्थित राहणार आहेत.

तरी शिवसेना , युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच व तमाम शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख- मंगेश लोके, युवासेना जिल्हा चिटणीस- स्वप्निल धुरी,शहरप्रमुख- शिवाजी राणे यानी केले आहे.