माय लेकिचे एकाच दिवशी निधन; कलंबिस्त येथील घटना…

139

राजू तावडे / सावंतवाडी :- कलंबिस्त – राईवाडा येथील श्रीम. प्रभावती तुकाराम सावंत (७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या निधना पाठोपाठच विवाहित मुलगी संगीता ठाकूर रा. कुडाळ, पिंगुळी हीचेही अवघ्या काहि तासात गोवा बांबुळी येथे निधन झाले. आज घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आईच्या निधनाची बातमी ऐकताच गोवा बांबुळी येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीचे अवघ्या काही तासातच निधन झाले.

माय-लेकीच्या एकाच वेळी निधनाच्या वृत्ताने कलंबिस्त मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रभावती सावंत त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.