बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात कु.योग्दा राऊळ प्रथम

75

बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर

कणकवली / प्रतिनिध
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे च्यावतीने घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रहार चे पत्रकार संतोष राऊळ यांची कन्या कु. योग्दा राऊळ हिने प्रथम क्रमांक मिळविला. वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगावच्या तृतीय वर्ष बी फार्मसी मध्ये योग्दा संतोष राऊळ ही शिकत आहे.विद्यापीठ स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत कॉलेजचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या चारही राऊंड मध्ये नाबाद यश प्राप्त करून कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळविला.कु. योग्दा हिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
महामहीम राज्यपालांच्या आदेशाने विद्यापीठ स्तरावर क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी च्या वतीने कोल्हापूर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. कोल्हापूर विभागात येणाऱ्या जिल्ह्यांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र,हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि औषध निर्मिती शास्त्र अशा सर्वच विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. अशा अटीतटीच्या स्पर्धेत कु.योग्दा राऊळ होणे आपले यश कायम टिकवून ठेवले आणि विभागात प्रथम येण्याचा मान मिळविला.त्यासाठी प्रा. नेहा साळुंखे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.यापूर्वी कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मधून जिल्हास्तरावर तर कणकवली कॉलेजमधून रत्नागिरी विभाग स्तरावर कु.योग्दा राऊळ हिने यश मिळविले होते. तिच्या या यशाबद्दल श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, जिल्हा परिषद सदस्या सौ. मनीषा माने, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. धनराज जडगे यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.