हिवतापाला झिरो करु, स्वतःपासून सुरुवात करू

17

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 25 एप्रिल हा जागतीक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी व प्रतिबंधात्मक उपाय अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य वाढावे हा जागतीक हिवताप दिन साजरा करण्याचा मुळ उद्देश आहे.

उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाकून न ठेवलेल्या पाणीसाठ्यात डासांची निर्मिती होते. तसेच पावसामुळे जागोजागी पाणी साठून राहते व डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे पावसाळ्यात हिवताप (मलेरिया), डेंग्यु, चिकुनगुनिया या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांमध्ये वाढ होते. डासांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी समाजातील सर्व स्तरावरून सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे.

डासांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी व प्रसार रोखण्यासाठी पुढील गोष्टींचा काळजी घेणे गरजेचे आहे. घराच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे पाणी (घाण व स्वच्छ) आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, सर्व प्रकारचे पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासून पूसून कोरडी करुन पुन्हा भरावीत, सर्व पाणी साठे घट्ट झाकून ठेवावेत, जे साठे रिकामे करता येत नाहीत किंवा झाकून ठेवता येत नाहीत. त्यात गप्पीमासे सोडावेत हे मासे डासांच्या अळ्या खातात, हे मासे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळतात. रात्री झोपताना मच्छरदानीचा वापर करावा, व्हेंटपाईपला जाळ्या बसविण्यास याव्यात, याबाबतची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.कोणत्याही प्रकारचा ताप हा हिवताप, डेंग्यु, चिकुनगुनिया असू शकतो, म्हणून ताप आल्यास त्वरीत शासकिय वैद्यकीय संस्थेत रक्त तपासू