आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराची घोषणा

17

देवगड/ प्रतिनिधी
देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०१८- १९ च्या देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराची बुधवारी घोषणा करण्यात आली. कै. आर. आर. लोकेसाहेब स्मृतिप्रीत्यर्थ साप्ताहिक देवदुर्ग संपादक आनंद लोके पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्रहार वेबचे हेमंतकुमार कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा तसेच पत्रकार परिवारातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक २८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
देवगड तालुका पत्रकार समिती विशेष सभा बुधवार दि. २४ एप्रिल रोजी देवगड शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या सभेत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दयाळ कांबळे (संपादक साप्ताहिक कोकणी दणका ), आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार शहरी विभाग राजेंद्र मुंबरकर (पत्रकार दैनिक तरुण भारत), आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार ग्रामीण विभाग सचिन लळीत (पत्रकार दैनिक पुढारी), आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार ग्रामीण विभाग प्रदीप घाडी (पत्रकार दैनिक तरुण भारत) यांना जाहीर झाले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर विभागाचे माजी माहिती अधिकारी सतीश लळीत, श्री रामेश्वर मुक्तदार वाचनालय मिठबावचे अध्यक्ष नंदकुमार सोमण, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे, सचिव उमेश तोरस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. देवगड येथे झालेल्या विशेष सभेस तालुकाध्यक्ष प्रशांत वाडेकर, सचिव स्वप्नील लोके, खजिनदार दिनेश साटम, उपाध्यक्ष साईनाथ गावकर, दयानंद मांगले, दयाळ कांबळे, हेमंतकुमार कुलकर्णी, सचिन लळीत, केदार सावंत, महेश तेली, साईनाथ सुके, संतोष साळसकर, प्रदीप घाडी, राजेंद्र साटम, गणेश आचरेकर, अयोध्या प्रसाद गावकर, राजीव पडवळ, श्रीकृष्ण रानडे, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.