सिंधुदुर्गतील वाघाचे अस्तित्व वनविभाग लपवत आहे – वनशक्तीचे प्रमुख स्टॅलिन दयानंद…

60

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडी मुळे वन्यप्राण्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. दोडामार्ग पासून राधानगरी अभयारण्यापर्यत 22 वाघ अस्तित्व असतनाही 6 वाघच असल्याची चुकीची माहिती वनविभाग समोर आणत आहे. आम्ही लवकरच वनविभागाचा खोटारडेपणा उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती वनशक्तीचे प्रमुख स्टॅलिन दयानंद यांनी आज बुधवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पर्यावरण अभ्यासक संदिप सावंत, नारायण पवार उपस्थित होते.

दयानंद म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ वर्षांत वननियम धाब्यावर बसवून मोठ्याप्रमाणात वृक्षतोड सुरू आहे.त्यामुळेच अनेक वन्यप्राणी ही जंगलातून शहराकडे येऊ लागले आहेत. वनविभाग आपल्या अहवालात नेहमी येथे वन्यप्राणी नाही असे म्हणते. जर वन्यप्राणी नाहीत तर मोठ्या प्रमाणात लोकांवर हल्ले कसे होतात. तसेच शेती बागायतीचे नुकसान होत आहे.त्याची नुकसान भरपाई आपण कशी काय देता असा सवाल दयानंद यांनी केला.

वनविभाग कोणाच्या तरी दबावात येऊन काम करत आहे.त्याना येथील निर्सगाचे काहि देणे घेणे नाही.असा आरोप ही दयानंद यांनी केला. तसेच चार दिवसापूर्वी ज्या परिसरात वाघाचे अस्तित्व दिसून आले त्याबाबत वनविभाग फारसे गंभीर नाही.ज्या ठिकाणी वाघ दिसला त्या ठिकाणी वनपथक अद्याप पर्यत जाऊनही आले नाही असा दावा ही दयानंद यांनी केला आहे.