कोकणातील जल पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या सोडविणेसाठी राज्य सरकार कटिबद्ध -बंदर मंत्री संजय बनसोडे…

48

सितराज परब / मालवण :- पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे बंदरे मंत्री श्री संजयजी बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेण्यात आली यावेळी पर्यटन महासंघ मालवण शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर,श्री काका कुडाळकर कार्याध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपस्थित होते यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने मा .मंत्री महोदयांना जलपर्यटन व्यावसायिकांच्या समस्या मांडण्यात आल्या यामध्ये जलपर्यटन व्यावसायिकांच्या जलपर्यटन व्यावसायिकांच्या नोंकेचा सर्वे व सर्वे प्रमाणपत्र स्थानिक जिल्हा कार्यालय मध्ये देण्यात यावी सर्वे करून झाल्यावर सर्वे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व्यावसायिकांना अनेक फेऱ्या मुंबई मेरीटाईम बोर्ड ऑफिस मध्ये माराव्या लागतात ,कोकणात पर्यटक सुट्टी च्या कालावधीत मे महिन्यात जास्त पसंती सागरी पर्यटनाला देतात परंतु मालवाहतूक जहाजाच्या असलेला अध्यादेश

कोकणातील जलपर्यटनाला लावून जलपर्यटन दरवर्षी 25 मे ला बंद करण्यात येते वास्तविक पर्यटन 10 जून पर्यंत जलपर्यटनासाठी कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची वर्दळ असते त्यामुळे जलपर्यटनाची मुदत दरवर्षी 10 जून पर्यंत करण्यात यावी.कोकणातील धरण,नदी,क्षेत्रात व्यावसायिकांस जलपर्यटनास बारमाही मुदत देण्यात यावी.

तसेच कोकणातील सागरी किनारी सरकारी जागा (शेरे जमीन) भाडेपट्ट्यावर देण्यासाठी सुलभ कार्यपध्धती राबवावी.या मागण्याविषयी चर्चा करण्यात आली तसेच कोकणातील जलपर्यटन व्यावसायिकांनी कुठलेही शासकीय मदत न घेता आपल्या स्वकर्तृत्वावर जलपर्यटन व्यवसाय उभा करून राज्यात जलपर्यटन क्षेत्राचे नाव देशात पोचविले आहे परंतु शासन मात्र जलपर्यटन नियमावली जलपर्यटन व्यावसायिकांच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे यावर बोलताना श्री संजयजी बनसोडे यांनी सांगितले की राज्य सरकार जलपर्यटन व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघास आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे सांगितले तसेच या मागण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली.