सुनेवर अतिप्रसंग केल्या प्रकरणी सासऱ्याला अटक; काळिमा फासणार्‍या घटनेने खळबळ…

121

वैभववाडी / प्रतिनिधी :- सुनेवर बलात्कार केल्या प्रकरणी सासऱ्यावर गुन्हा दाखल  करून त्याला अटक करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४  या कालावधीत तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. संशयीत आरोपीला वैभववाडी पोलिसांनी ओरोस जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील पीडिता ही अपंग आहे. 28 डिसेंबर रोजी तिचे लग्न झाले होते. लग्नाच्या तीन दिवसानंतर नवरा व सासू आपल्या दुकानात गेली होती. तर सासरे व पीडिता घरात होते. यावेळी रात्री ८ वाजता चे दरम्याने सासऱ्याने जबरदस्ती आतल्या खोलीत नेऊन बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तोच प्रकार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

घडलेला प्रकार पीडितेने आपल्या आई ला फोन वरून सांगितला. त्यानंतर आई घरी आली तीने पीडितेच्या सासूला जाब विचारून नवऱ्याला समज देण्यास सांगितले मात्र नवरा ऐकत नाही मी काय करू असे उत्तर दिले. त्यानंतर सासऱ्यांनी १३ फेब्रुवारी ला माहेरी सोडले. पाच दिवसानंतर पीडितेला तीच्या आई ने पुन्हा सासरी आणून सोडले. त्यानंतर सासऱ्यांनी मारहाण करून पुन्हा जबरदस्ती बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतर तीन महिन्यात सासऱ्याने पाच ते सहा वेळा बलात्कार केल्याचे म्हटले आहे.

या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर सासऱ्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल करीत आहेत.