बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, पण पाच वर्षांनंतर – रामदास आठवले

12

मुंबई – ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभुमीवर 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगची तातडीने भेट घेतली आणि मतमोजणीपूर्वी निवडक मतदान केंद्रांमधील “व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अशातच आता वृत्तमाध्यमांशी संवाद साधतांना  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांना चांगलाच टोला लगावला आहे.

रामदास आठवले म्हणाले, “ईव्हीएम’मध्ये छेडछाड झाल्याच्या प्रश्न आहे यावर जर निवडणुक आयोगाने  बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या निर्णय घेतला तर त्यासाठी सुद्धा आमच्या पक्षातर्फे निवडणूक लढण्याची तयारी आहे. जर  बॅलेट पेपरवर निवडणुक घेतली असता आम्ही जिंकलो तर त्यावेळी सुद्धा विरोधी पक्ष म्हणणार की बोगस निवडणूका झाल्या आहे. तसेच  ईव्हीएम मशीन एखादी खराब होऊ शकते.  मात्र यामुळे “ईव्हीएम’मध्ये छेडछाड प्रश्न उभा करणे योग्य नाही. मला असे वाटते की, विरोधी पक्षाच्या “ईव्हीएम’मध्ये छेडछाड मुद्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही आहे. तरी सुद्धा निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या निर्णय घेतलाच तर पुढील पाच वर्षांनंतर निवडणूका होतील.