राज्यस्तरीय योगासन‌ परीक्षेत कासार्डेतील संजय भोसलेंचे यश…

9

कणकवली/प्रतिनिधी:-

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण व परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक संजय भोसले यांनी अभिनंदनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल राज्य अध्यक्ष भालचंद्र तथा बापू पाडळकर, जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय मालपाणी आदी मान्यवरांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले आहे.

सदर परीक्षा व प्रशिक्षण कार्यक्रम सलग चार दिवस सुरू होता. संजय भोसले हे गेले १३ वर्षाहून अधिक काळ कासार्डे विद्यालयात योगासनाचे विद्यार्थी घडवण्याचे अविरत काम करत आहेत. ते शारीरिक शिक्षणाचे शिक्षक नसतानाही योगाची आवड असल्याने या क्षेत्राकडे वळले आहेत. अद्याप पर्यंत त्यांचे अनेक विद्यार्थी शालेय स्तरावरील स्तरावरील जिल्हा वराज्य स्तरावर चमकले असून असोसिएशन मार्फतही राज्य पातळी पर्यंत धडक मारलेले आहेत.

तसेच कासार्डे—तळेरे दशक्रोशीत पतंजली योग समिती सिंधुदुर्ग च्या वतीने अनेक योग शिबीरेही घेतलेली आहेत. ते स्वतः कांही वर्षे मोफत योग वर्गही चालवत .या दैनिक योग वर्गाचा अनेकांना लाभ झालेला आहेत.

राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स असोसिएशनने घेतलेल्या या प्रशिक्षण व परीक्षेत पंचांची भूमिका आणि त्यांची जबाबदारी, योगासनांच्या विविध प्रकारांचे परीक्षण करण्याच्या पद्धती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके ,पारंपारिक योगासनाचे परिक्षण ,परीक्षणाचे तंत्र, योगासन स्पर्धेचे नियम व अटी ,सूक्ष्म गुणपद्धती ,बाद पद्धती आणि अनुशासन या विषयावर भर देण्यात आला होता

या परीक्षेतून तयार झालेले पंच राज्य पातळीवरील योगासन स्पर्धेत परीक्षण करून त्यातून राष्ट्रीय स्पर्धांसाठी स्पर्धकांची निवड करतील

अशा या मानांकित राज्यस्तरीय योगासन जज्ज/रेफरी परीक्षेत उत्तम यश मिळवल्या बद्दल कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य मधुकर खाडये, कासार्डे विकास मंडळाचे स्थानिक व.यवस्था समितीचे कार्याध्यक्षध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली परिवाराचे सर्व कार्यकारणी व सदस्य ,कणकवली तालुका पतंजली परिवाराचे कार्यकारिणी व सदस्य, कासार्डे विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कासार्डे —तळेरे दशक्रोशीतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.