श्री. राजेंद्र अर्जुन पवार यांस सन २०२१-२२ चा महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर…

28

मुंबई/प्रतिनिधी:-

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा दि. २ मे २०२३ रोजी केली आहे. या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथील कर्मचारी श्री. राजेंद्र अर्जुन पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध उद्योगांत काम करणाऱ्या एकूण ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे.  पुरस्कार वितरण समारंभ लवकरच कामगार मंत्री डाॅ. सुरेश खाडे यांच्या शुभहस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे. श्री. राजेंद्र पवार हे आपली कार्यालयीन जबाबदारी पार पाडत असतानाच विविध सामाजिक सेवा व साहित्य सेवेमध्ये योगदान देत आहेत. नुकताच त्यांचा एक “हरवलेली कविता हा काव्यसंग्रह व “आध्यात्मिक आनंदाचा झरा” या लेखसंग्रहाच प्रकाशन झालेलं आहे.