सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. २३ ते २७ जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट…

23

ब्यूरो न्यूज / सिंधुदुर्ग :-

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहिती नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 23 जुलै 2023 ते दिनांक 27 जुलै 2023 या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे.

या कालावधीत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तरी या पार्श्वभूमीवर सर्वांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.