कलमठ मधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाचा केला पोलखोल…

10

कणकवली/प्रतिनिधी:-

कलमठ मध्ये नागरी सुविधा योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाचा नमुनासमोर आला असून पहिल्याच पावसात अक्षरशः रस्त्याची माती झाली. आज कलमठ येथील शिवसैनिकांनी स्थनिक ग्रामस्थांना सोबत घेऊन या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच काम निकृष्ट झाल्याचे निदर्शनास आले.दायित्व कालावधीत काम असल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून ते काम पावसाळ्यानंतर सुस्थितीत करून घेण्याचे आश्वासन ग्रामस्थाना देण्यात आले यावेळी ग्रा.प.सदस्य श्री.अनुप वारंग,धीरज मेस्त्री,सचिन खोचरे व युवासेना समन्व्यक राजू राठोड, माजी सरपंच धनश्री मेस्त्री,युवासेना संघटक नितेश भोगले,आशिष कांबळे,प्रणय शिर्के, एकनाथ मेस्त्री,आशिष मेस्त्री,सचिन पवार,किशोर जाधव उपस्थित होते. या रस्त्याचे निकृष्ट काम होईपर्यंत संबंधित विभाग झोपा काढत होता का? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.