हरवलेली सोन्याची चैन पोलिसांनी केली सुपूर्द…

21

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी बाजारपेठे हरवलेली सोन्याची चैन सांगूळवाडी कृषी विद्यालय च्या शिक्षिका प्रतिक्षा दत्तात्रय काळे यांची असून वैभववाडी पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी आज सुपूर्द केली

मंगळवार दिनांक 23 मे रोजी करूळ येथील आनंद ऊर्फ बाळा पाटील आणि सुनील कुंभार यांना सोन्याची चैन बाजारपेठत सापडली होती या दोन्ही मित्रानी प्रामाणिक पणा दाखवत मौल्यवान वस्तू पोलिसांकडे सुपूर्द केली होती. याबाबत सोशल मीडिया आणि वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती यामुळे प्रतिक्षा काळे यांनी पोलीस निरीक्षक श्री सागर खंडागळे, पोलीस श्री कांबळे, श्रीमती शिंगाडे यांची भेट घेऊन ओळख पटल्याने पोलिसांनी सोन्याची चैन परत केली.